Uncategorized

मा. कुमार चिंता (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी पोस्टे हददीत घडलेले गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोस्टे स्तरावर कौशल्यपुर्ण तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते.

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पोफाळी येथे दि. २५/१०/२०२४ रोजी चे दुपारी १४.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे ऐजाज शहा युसुफ शहा, वय ३१ वर्षे, रा. उमरी (ज), ता. हदगाव, जि. नांदेड यांनी फिर्याद दिली की, दि. २५/१०/२०२४ रोजी चे सकाळी ०९.०० वा. चे सुमारास फिर्यादी व त्यांचा चुलत भाउ नासीर शेख रज्जाक शेख, वय २८ वर्षे असे घरुन १,५०,०००/- रुपये घेवुन जुनी गाडी खरेदी करण्यासाठी मोटारसायकल ने उमरी येथुन उमरखेड करिता जाण्यासाठी निघाले. उमरखेड येथे जुने वाहन पाहुन पसंत न पडल्याने १०.०० वा. पुन्हा पुसद च्या दिशेने निघाले. पुसद जवळील धनसळ गावाला जावुन ओळखीचे शेख मन्नान शेख अमीर याचेसोबत तेथील ग्राहकाची जुनी गाडी बघीतली. गाडी पसंत न पडल्याने फिर्यादी व त्याचा चुलत भाउ नासीर शेख रज्जाक शेख असे मोटारसायकल ने परत उमरखेड जात असतांना पोलीस स्टेशन पोफाळी चे हददीत शिळोणा घाटात पाठीमागुन आलेल्या मोटारसायकल वर सवार असलेल्या व तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात तिन इसमांनी अचानक समोर येवुन फिर्यादी च्या डोळयात मिरचीपुड फेकली, मिरचीपुड डोळयात गेल्याने भांबविलेल्या अवस्थेत फिर्यादीने त्यांची मोटारसायकल थांबविली. मिरचीपुड फेकणा-या तिन इसमांपैकी दोघांनी चुलत भावाच्या खिशातील व फिर्यादीच्या खिशातील एकुण १,५०,०००/- रुपये जबरीने हिसकावुन काढुन घेतले व मोटारसायकल ने उमरखेड च्या दिशेने पसार झाले, अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोस्टे पोफाळी येथे अप.क. ३६८/२०२४ कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस स्टेशन पोफाळी च्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच आरोपीच्या येणा-या.
जाणा-या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज ची बारकाईने तपासणी केली व सायबर सेल यवतमाळ येथुन गुन्हयासंबंधाने तांत्रीक मदत मिळवीली.

घटनास्थळी घडलेला प्रकार व तांत्रीक विश्लेषण याच्या आधारे सदर घटनेमधे असलेले जबरी चोर हे फिर्यादी चा पाठलाग करत नसल्याचे दिसुन आले परंतु त्यांना मिळत असलेल्या ठोस माहीतीमुळे ते फिर्यादी जवळ पोहचल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याआधारे संशयीत सर्व इसमांची तपासणी करुन फिर्यादी सोबत असलेला त्याचा चुलत भाउ नामे नासीर शेख रज्जाक शेख हयानेच कट रचुन इतर तिन आरोपींसोबत संगणमत करुन गुन्हा घडवुन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तपासात निष्पन्न झालेल्या माहीतीच्या आधारे यातील फिर्यादीचा चुलत भाउ नासीर शेख यांस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने इतर तिन साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबुल केले. यातील आरोपीकडुन पोफाळी पोलीसांनी फिर्यादीकडुन हिसकावीलेल्या एकुण १,५०,०००/- रुपये रकमेपैकी एकुण ६९०००/- रुपये नगद रक्कम व आरोपीचा ओप्पो कंपनीचा एक अॅन्ड्रॉईड मोबाईल फोन किंमत १५०००/- रुपये असा एकुण ८४०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. गुन्हयातील इतर फरार आरोपींचा पोफाळी पोलीस कसुन शोध घेत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. कुमार चिंता साहेब, पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. पियुष जगताप साो, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. हनुमंत गायकवाड साो, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमटे, पोलीस नाईक हर्षद पंडीतकर, पोलीस कॉन्स्टेबल लखन जाधव, हिम्मत बंडगर, बालाजी राठोड, चालक फिरोजोददीन काझी, परशुराम इंगोले यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!