Uncategorized
पुसद भाजपकडून ‘स्नेह संवाद’ कार्यक्रम उत्साहात

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
पुसद येथे २३ ऑगस्ट रोजी माजी आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, पुसद विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ‘स्नेह संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात पुसद विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते, पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख तसेच कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधण्यात आला. संघटनात्मक बाबींसह पक्षाच्या आगामी वाटचालीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे विविध नेते, पदाधिकारी, आघाडी प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमध्ये आपुलकीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच संघटनात्मक एकजूट वाढविण्यासाठी ‘स्नेह संवाद’ कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.



