शहर

मूल्यवर्धन 3.0 चे जिल्हा समन्वयक श्री मनीष बनसोड यांची जि प उ प्राथ शाळा कळमुला येथे सदिच्छा भेट

उमरखेड:-

विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाची जडणघडण घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “मूल्यवर्धन 3.0” या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कळमुला येथे जिल्हास्तरीय भेट उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या प्रसंगी मूल्यवर्धन 3.0 चे जिल्हा समन्वयक मनीष बनसोड तसेच तालुका समन्वयक
अंकुश वाळुककर यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचा आढावा घेत अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना “शांतता संकेत” आणि “वर्गनियम” यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून त्याची अंमलबजावणी विद्यार्थ्यांकडून करून घेतली. विद्यार्थ्यांनीही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या उपक्रमात सहभाग नोंदवत शिकविलेल्या बाबींचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

भेटीदरम्यान समन्वयकांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे, शिस्तीचे आणि शिक्षकांच्या प्रभावी अध्यापनाचे विशेष कौतुक केले. मूल्याधारित शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने जिल्हा समन्वयक मनीष बनसोड व तालुका समन्वयक अंकुश वाळुककर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शितल तिडके मॅडम, शिक्षक विशाल सूर्यवंशी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूल्यवर्धन 3.0 या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सकारात्मक विचार, परस्पर आदर, जबाबदारीची जाणीव आणि जीवनमूल्यांची रुजवण प्रभावीपणे होत असल्याचे चित्र या भेटीदरम्यान पाहायला मिळाले. या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button