Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

फुलसावंगीत महसूल विभागाची अखेर कारवाई; थर्माकोलच्या तराफ्याने अवैध रेती उपशावर लगाम


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
फुलसावंगी : पैनगंगा नदीपात्रातून थर्माकोलच्या तराफ्याच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याचे चित्र फुलसावंगी परिसरात दिसून येत होते. विशेष म्हणजे दिवसा नदीपात्रातून रेती काढणे व वाहतूक सुरू असतानाही महसूल विभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. महसूल अधिकाऱ्यांच्या नाकावर ठेचून हा अवैध उपसा सुरू असल्याची चर्चा परिसरात होती.
याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता की, दिवसा खुलेआम रेती वाहतूक होत असताना प्रशासन गप्प का? अखेर २ ऑक्टोबर २०२६ रोजी महसूल विभागाने कारवाई केली.
महासागर वृत्तसेवेच्या वृत्तानुसार, फुलसावंगी परिसरातील पैनगंगा नदीपात्रातून थर्माकोलच्या तराफ्यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने कारवाई केली. एसडीओ सखाराम मुडे व परिविक्षाधीन एसडीओ ओंकार एकाळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने नदीपात्रात छापा टाकला. या कारवाईत रेती तस्करीसाठी वापरण्यात येणारे अडीच लाख रुपये किमतीचे थर्माकोलचे तराफे जप्त करून जागीच जाळून नष्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच कारवाईदरम्यान दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले.
या कारवाईत मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, गोविंद ठाकरे, तलाठी पंजाब सानप, विनोद ढोणे, संतोष जाधव, योगेश मारकवार तसेच महसूल सहाय्यक अशोक बोनगुळवार यांच्या पथकाने सहभाग घेतला.
कारवाई अखेर झाली असली तरी दिवसा सुरू असलेल्या अवैध रेती उपशाकडे यापूर्वी प्रशासनाचे लक्ष का गेले नाही, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. पैनगंगा नदीपात्रातील अवैध रेती उपशावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी महसूल विभाग आता कोणती भूमिका घेतो, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button