जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही तलावातून पाण्याचा उपसा सुरू
बेलदरी व माळवागत सिंचन तलावातील पाणी उपशामुळे नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील बेलदरी सिंचन तलाव तसेच माळवागत सिंचन तलावातून मोटारीद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी पाणी उपशाबाबत आदेश जारी केलेले असतानाही तलावातून पाणी उपसा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाकडून लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत पाहणी करून नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्या मोटारी जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदारांनी मस्के यांनी दिली.
तलावातील पाणीसाठा हा परिसरातील नागरिकांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा आहे. मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू राहिल्यास भविष्यात नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावातून सुरू असलेला अनधिकृत अथवा आदेशाच्या विरोधातील पाणी उपसा तातडीने थांबविणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होणार? असा सवाल आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आदेश जारी होऊनही मोटारी सुरू असल्याने महसूल प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



