Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

जनता ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी १८ जणांना नोटीस
१५ दिवसांत रक्कम भरण्याचे निर्देश; मालमत्ता जप्ती व विक्रीचीही नोटीसमध्ये तरतूद


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : महागाव येथील जनता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., महागावच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी सहकार विभागाने १८ संबंधितांना मागणी नोटीस बजावली आहे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पुसद तथा वसुली अधिकारी के. एस. मस्के यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस २२ सप्टेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८८ अंतर्गत झालेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने कलम ९८ अंतर्गत दाखला निर्गमित करण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १५६(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७ मधील तरतुदीनुसार थकीत रकमेच्या वसुलीसाठी के. एस. मस्के यांची वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नोटीसमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, १८ जणांकडून एकूण ४९ लाख ५६ हजार ७४५ रुपये मूळ वसुलीपात्र रक्कम दाखविण्यात आली आहे. याशिवाय संस्थेने आकारलेले व्याज आणि लागू शासकीय अधिभाराची रक्कमही वसूलपात्र असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
थकीत रकमेतील सर्वाधिक रक्कम जयंत अरविंद पांडे यांच्या नावावर १९ लाख ४५ हजार ५०४ रुपये दाखविण्यात आली आहे. त्यानंतर काही व्यक्तींच्या नावावर २ लाख ५३ हजार २२७ रुपये, तर काहींच्या नावावर २ लाख २८ हजार २९५ रुपये अशी रक्कम नमूद आहे.
१५ दिवसांची मुदत
सहकार विभागाने संबंधितांना वसूलपात्र रक्कम, व्याज आदींचा भरणा नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत संस्थेकडे करण्याचे निर्देश दिले आहेत.
विहित मुदतीत दाव्यातील रक्कम व्याज व खर्चासह जमा न केल्यास संबंधितांच्या जंगम व स्थावर मालमत्तेवर बोजा चढविणे, त्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार मालमत्ता जप्त करून विक्री करणे आणि त्यातून संस्थेची थकीत रक्कम वसूल करणे, अशी पुढील कार्यवाही केली जाऊ शकते, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
तसेच थकीत रक्कम वसुलीसाठी होणारा खर्चही संबंधितांकडूनच वसूल करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे महागावच्या जनता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या थकीत कर्ज वसुलीचा मुद्दा चर्चेत आला असून, १५ दिवसांच्या मुदतीत संबंधितांकडून रक्कम भरली जाते की पुढील जप्ती-विक्रीची कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button