आर्णी नगरपरिषदच्या स्वच्छता दूत म्हणून परवेज बेग मिर्झा यांची नियुक्ती

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
(फोटो) आर्णी नगर परिषद कार्यालयात हाफिज शेख स्वच्छता निरीक्षक यांच्या हस्ते स्वच्छतादूत नियूक्ती पञक स्विकारताना परवेज बेग मिर्झा
आर्णी ता,2: स्वच्छ सर्वेक्षण 2027 अंतर्गत आर्णी नगरपरिषदच्या स्वच्छता दूत म्हणून परवेज बेग मिर्झा यांची निवड नियुक्ती पञक देवून आज ता,2 आँक्टोंबरला करण्यात आली आहे,
आर्णी शहरातील स्वच्छता, कचरा वर्गीकरण, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्ती तसेच सार्वजनिक स्वच्छता याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि नागरिकांचा स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छता दूत म्हणून कार्य करण्याची जबाबदारी परवेज बेग मिर्झा यांना देण्यात आली आहे.

स्वच्छतादूत म्हणून आर्णी नगर परिषदने दिलेली जवाबदारी आर्णीकर नागरिक म्हणून प्रामाणिकपणे पार पाडणार असून माझ्या सामाजिक कार्यात स्वच्छतादुतपदी नियूक्तीने अजून सामाजिक कार्य करण्याची उर्जा मिळाली आहे यामूळे आर्णी नगर परिषदचे मूख्यधिकारी रवींद्र राऊत, मनोज कुडमथे नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख
हाफिज शेख स्वच्छता निरीक्षक नगरपरिषद,पल्लवी रत्ने शहर समन्वयक नगरपरिषद यांचे आभार असे मनोगत परवेज बेग मिर्झा यांनी व्यक्त केले
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



