उमरखेड महिला कांग्रेसचा जनता दरबार,महिलांचा प्रचंड प्रतिसाद !
(लाडकी बहिण योजनेतुन शेकडो महिलांचे नावे कमी ; लाभ मिळवून देण्यासाठी कांग्रेस मैदानात )

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
उमरखेड : निवडणुकीच्या तोडांवर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविली होती. मात्र त्यानंतर शेकडो महिलांची नावे कमी करण्यात आली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लाडक्या बहिनींना, त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी, जनता दरबार घेत पुन्हा लाभ मिळवून देण्यासाठी, अभियान राबविले आहे. महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने, ३० सप्टेंबरच्या दुपारी जनता दरबार आयोजित केला, यावेळी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.
स्थानिक कांग्रेस कार्यालयात, बुधवारी पार पडलेल्या जनता दरबाराला, यवतमाळच्या जिल्हा महिला अध्यक्षा वंदना आवारी, उपाध्यक्ष नीलिमा काळे, जिल्हा सचिव पुजा धुळे, प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी उमरखेड शहर व तालुक्यातील शेकडो योजनेतील वंचित महिलांनी, योजनेतील उडचणी, अजार्ची रखडलेली प्रक्रिया, कागदपत्रांच्या तांत्रिक समस्या व मोठ्या प्रमाणात पात्र महिलांची नावे कापल्याचा मुद्दा, कांग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. त्यावर महिला पदाधिकाऱ्यांनी , उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन करत या समस्या प्रशासनाकडून तातडीने सोडवून घेण्याचा शब्द दिला. यावेळी नावे कमी केलेल्या महिलांची आवदने भरून घेण्यात आली. यावेळी शेकडो महिलांनी उपस्थिती लावल्याने, कार्यक्रमला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
हा उपक्रम महिला कांग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षा मनिषा कऱ्हाळे, महिला शहर अध्यक्षा सागर शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी नगर सेविका राधा इंगोले, नंदा दवणे, यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनीता शहाणे यांनी केले. सदर जनता दरबाराचे नियोजन, कांग्रेस नेते गोपाल अग्रवाल व गजानन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



