Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

हिमायतनगर येथे २०० वर्षे जुना ऐतिहासिक वृक्ष तोडल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजिम हिंदुस्तानी यांचा उपोषणाचा इशारा


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


हिमायतनगर: ( तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
हिमायतनगर शहरातील मुख्य बाजार चौक परिसरातील सुमारे २०० वर्षे जुना आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा वृक्ष नागरिकांना सावली देणारा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग होता, तसेच दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आश्रय होता.


हा वृक्ष तोडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत असताना, इतक्या जुन्या वृक्षाची तोड करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची कायदेशीर परवानगी घेतली होती का, झाडाची अधिकृत पाहणी झाली होती का, तो धोकादायक किंवा रोगग्रस्त होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकरणी वन विभागाने तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करावी, वृक्ष तोडीचा अहवाल व परवानग्या तपासण्यात याव्यात आणि कोणत्याही परवानगीशिवाय वृक्षतोड झाली असल्यास जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स. अ. अजिम स. अब्दुल्ला यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येत्या ४ दिवसांत दोषींवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई न झाल्यास वन विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अर्जदार असीम अब्दुल्ला यांनी दिला आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button