Uncategorized
वटफळी येथे भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
वटफळी (ता. नेर, जि. यवतमाळ) येथे राजे शिवछत्रपती क्रीडा मंडळ वटफळी यांच्या वतीने दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार संजयजी देशमुख यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुलजी ठाकरे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर तसेच विविध पक्षांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित क्रीडाप्रेमींशी सर्व मान्यवरांनी संवाद साधत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
मुलींच्या उद्घाटकीय सामन्याचे पारितोषिक व विजयचिन्ह डी. के. दामोधर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.



