गोरोबा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाने बाजी; विभागीय स्पर्धेसाठी निवड

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
एस पी दळवी
उमरखेड प्रतिनिधी :
येथील श्री गुरुदेव गोरोबा विद्यामंदिरचा विद्यार्थी चि. अनुराग गजानन ठाकरे याने जिल्हास्तरीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अनुरागने आपल्या दमदार कामगिरीने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्तरासाठी निवड मिळवली आहे.

या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा सन्माननीय प्रीती ताई धामणकर, सचिव सुभाष डावरे सर, सहसचिव श्री श्रीनिवास भाऊ धामणकर, मुख्याध्यापक माननीय श्री निनावे सर, पर्यवेक्षक माननीय मेहरे सर, तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री सुभाषरेड्डी येनगोड सर यांनी अनुरागचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी त्याच्या पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अनुरागच्या या यशामुळे उमरखेड तालुक्यातून एका उदयोन्मुख खेळाडूचे नाव पुढे आले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



