Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

एटीएम कार्डची अदलाबदल करून 28 हजारांची फसवणूक; मुंबईतून आरोपी जेरबंद


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; 100 टक्के रक्कम केली जप्त

उमरखेड :एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाची नजर चुकवून एटीएम कार्डची अदलाबदल करीत त्याच्या खात्यातून तब्बल 28 हजार रुपये लबाडीने काढणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीला उमरखेड पोलिसांनी मुंबई येथून निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील संपूर्ण 28 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. उमरखेड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई केली.
दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.11 वाजता मोहननगर, उमरखेड येथील साईनाथ शेषराव शिंदे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र एटीएममधून पैसे निघत नसल्याचे पाहून त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका इसमाने मदत करण्याचा बहाणा केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित इसमाने शिंदे यांच्याकडील एटीएम कार्ड स्वतःकडे घेतले आणि त्यांच्या हातात दुसरे एटीएम कार्ड देऊन पासवर्ड टाकण्यास सांगितले. त्यानंतर तो इसम तेथून निघून गेला. काही वेळातच शिंदे यांच्या बँक खात्यातून तीन व्यवहारांद्वारे एकूण 28 हजार रुपये काढण्यात आले. त्यामुळे त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कमही संपली.
या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 751/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 व 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आरोपीचा तातडीने शोध घेऊन अटक व मुद्देमाल जप्त करण्याच्या सूचना उमरखेडचे ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना दिल्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख सय्यद कमालउद्दीन खान (वय 36), मूळ रा. सगरासुंदरपूर, कालगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश; सध्या रा. यादव मिश्रालाल चाळ, यादव नगर, खैरानी रोड, साकीनाका, अंधेरी (पश्चिम), मुंबई अशी निष्पन्न केली.
यानंतर उमरखेड पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना झाले. आरोपीच्या राहत्या ठिकाणी शोध घेतला असता पोलिसांनी गुन्ह्यातील एटीएम कार्डची अदलाबदल करून मिळविल्याचे सांगितलेली 28 हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम जप्त केली. या कारवाईमुळे गुन्ह्यातील 100 टक्के रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
डी.बी. पथकाच्या तपासकौशल्याचे कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव कायंदेपाटील आणि उमरखेडचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार पंतगे, पोलीस हवालदार संदीप ठाकूर, चंदन जाधव, अतुल तागडे, पोलीस कॉन्स्टेबल दिगांबर गिते, संघशील टेंबरे, विष्णू राठोड तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल रूद्रा यांनी सहभाग घेतला.
एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीकडून मदत घेताना नागरिकांनी आपले कार्ड, पिन आणि बँक खात्याची माहिती कोणत्याही व्यक्तीस देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button