ईजनी येथील घरकुल लाभार्थी रेती पासून वंचिततहसीलदार लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देतील का? ( भाग 3)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात ईजनी गावामध्ये 100 घरकुल शासनाने मंजूर केले आहे .त्याचे बांधकाम सुद्धा सुरू झाले परंतु महागाव येथे तहसीलदार पटवारी मंडल अधिकारी यांनी पाच ब्रास वाळू उपलब्ध करून द्या म्हणून सांगण्यात आले उपसरपंच शंकर रामजी पवार ,किरण जाधव ,सुरेश राठोड सुरेश साहेबराव जाधव, बाळू पंडित ,यांनी महागाव येथे येऊन तहसीलदाराला शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून द्या अशी विनंती करण्यात आली. परंतु तहसीलदार मंडल अधिकारी व तलाठी यांनी अक्षरशा दुर्लक्ष करून लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू पासून वंचित ठेवल्यामुळे लाभार्थ्यांना 6000 रुपये प्रमाणे एक ट्रॅक्टर वाळू विकत घ्यावी लागत आहे .त्यामुळे आलेला हप्ता हा वाळू घेण्यात चालला त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन महसूल मंत्र्यांचे आदेश व शासनाच्या परिपत्रकानुसार लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या अशी मागणी उपसरपंच गावातील नागरिक लाभार्थी यांनी केली .



