Uncategorized

उमरखेड येथे समाधान शिबिराचे आयोजन! तालुक्यातील ५०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

महसूल व वन विभाग यांच्या संयुक्तिक विद्यमानाने तहसील कार्यालय अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राजस्व मंडळाद्वारे स्व. अनंतराव देवसरकर सभागृह, ढाणकी रोड उमरखेड येथे ३० जून सोमवार रोजी आयोजित करण्यात आले होते. उमरखेड तहसीलचे तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. तसेच प्रमुख उपस्थिती लाभलेले सुनिल पाटील चिंचोलकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखले व्यतिरिक्त करण्यात आले.
यामध्ये फार्मर आयडी, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, श्रावणबाळ, संजय गांधी पात्र लाभार्थी यांचे अर्ज, मयत वारसा फेरफार अशा अनेक दाखले एकावेळी – एका छताखाली वितरण करण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांच्या वेळेची बचत झाली. यावेळी तालुक्यातील अनेक गावातील सुमारे ४०० ते ५०० लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिर अभियानाला मंडळ अधिकारी संजय वाघमारे, ग्राम महसूल अधिकारी प्रकाश हापसे, गणपत शिरसागर, अनिकेत शिरसाट, संजय केंद्रे, संतोष खैरनार, महसूल सेवक व कृषी विभाग व सेतू सेवा केंद्र चालक जगदीश भुसावार व प्रशांत मेने इत्यादीचे योगदान लाभले.
नूतन शिधापत्रिका अर्ज, शिधापत्रिका वाटप त्याचबरोबर कृषी विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, भुमि- अभिलेख विभाग, नगरपरिषद व वनविभाग यांच्या संदर्भातील योजनेचे उपस्थित लाभार्थ्यांना त्या – त्या विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले व त्यांच्या कडून उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारीचे बऱ्याच प्रमाणात निवारण सुद्धा करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button