हिमायतनगर शांतता कमिटीचा कडक इशारा: DYSP भंडारकर, PI केंद्रे आणि नगराध्यक्ष शेख रफिक यांच्या उपस्थितीत बैठक; गणेशोत्सवात DJ वर पूर्ण बंदी, नियम मोडल्यास होणार थेट कारवाई!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम ):
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची धडाकेबाज बैठक पार पडली. या बैठकीस डीवायएसपी जगदीश भंडारकर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, नगराध्यक्ष शेख रफिक, उपतहसीलदार, गावांचे सरपंच, नगरसेवक, गणेश मंडळांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार “गणेशोत्सवात DJ वाजवला तर कठोर कायदेशीर कारवाई अटळ आहे”, असा कडक इशारा डीवायएसपी भंडारकर यांनी दिला. “डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये वापरा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवा”, असे आवाहन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केले.
तसेच मिरवणुकीच्या मार्गावर जिथे अतिक्रमण असेल, ते अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष शेख रफिक यांनी दिले. यासोबतच गणेश मंडळांना येणाऱ्या वीज, रस्ते व स्वच्छतेच्या समस्याही त्वरित सोडवल्या जातील, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



