शहर

वॉर्ड नाही, माझे कुटुंब!” नगरसेवक म. मुजतबा मतीन यांचा पहाटे ६ वाजल्यापासून नाली सफाईचा धडाका;

हिमायतनगरमध्ये स्वच्छतेचा नवा आदर्श!
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): “प्रभाग १४ हा केवळ माझा वार्ड नसून माझे घर आहे,” असे भावनिक उद्गार काढणारे नगरसेवक म. मुजतबा मतीन यांनी आज आपला शब्द प्रत्यक्ष कृतीतून खरा करून दाखवला. पहाटे ६ वाजल्यापासून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाली सफाईच्या कामाचा धडाका लावला.
​विशेषतः नाल्यांच्या पायऱ्यांखाली आणि सिमेंटच्या बांधकामाखाली (रॅम्प) जो गाळ व कचरा वर्षानुवर्षे अडकला होता, तो काढण्यासाठी त्यांनी स्वतः थांबून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. जोपर्यंत पाण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला नाही, तोपर्यंत म. मुजतबा मतीन तेथून हलले नाहीत. एका तरुण लोकप्रतिनिधीने दाखवलेली ही कामाची तळमळ पाहून शहरातील इतर वॉर्डांमधील नागरिकही थक्क झाले आहेत.
​”नेते अनेक पाहिले, पण आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्वतः उभे राहून घाण उपसणारा असा लोकप्रतिनिधी प्रथमच पाहिला,” अशा शब्दांत प्रभाग १४ मधील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. म. मुजतबा मतीन यांच्या या धडाकेबाज कामामुळे शहरात त्यांच्या नावाची मोठी लाट निर्माण झाली असून, नव्या पिढीच्या नगरसेवकांनी कसा आदर्श ठेवावा, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button