गणेशोत्सवात डीजेला परवानगी द्या; अन्यथा अन्यायाविरुद्ध शिवसेना शिंदे गट आक्रमक

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक; शहरप्रमुखांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
उमरखेड | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमरखेड शहरात डीजे व ध्वनी संयोजकांना परवानगी देण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना शहरप्रमुख अॅड. संजीवकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरखेड येथे उपस्थित राहून निवेदन सादर करण्यात आले.
उमरखेड शहराला गणेशोत्सवाची सुमारे ५० वर्षांची परंपरा असून, काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. गणेशोत्सवाच्या काळात डीजे व ध्वनी संयोजकांचा वापर होत असताना यंदा पोलिस प्रशासनाकडून डीजेला परवानगी मिळणार नसल्याच्या तोंडी सूचना दिल्या जात असल्याचा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
‘कायदा सर्वांसाठी समान हवा’
निवेदनात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशांचा दाखला देत नियमांचे पालन करून ध्वनी संयोजकांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयीन आदेशांचा आधार घेत जर काही मर्यादा असतील तर त्या सर्व गणेश मंडळे व ध्वनी संयोजकांना समान पद्धतीने लागू कराव्यात; मात्र कोणत्याही एका घटकाला लक्ष्य करून कारवाई करू नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांमुळे उमरखेडमध्ये डीजेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून नियम व अटींच्या अधीन राहून गणेशोत्सवात डीजेची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
परवानगी नाकारल्यास आंदोलनाचा इशारा?
शिवसेनेने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत उमरखेड शहरात कोणत्याही प्रकारचा अन्याय अथवा भेदभाव होऊ नये, अशी मागणी केली आहे. नियमांचे पालन करण्याची तयारी असताना परवानगी नाकारण्यात आली तर त्याविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र भूमिका घेण्यात येईल, असा सूर यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना शिवसेनेने थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडक देत निवेदन दिल्याने उमरखेडच्या गणेशोत्सवातील डीजेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन शिवसेनेच्या या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे गणेश मंडळे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732



