माळकिन्ही येथील शिवलिंग स्वामी मठात सव्वा लाख शिवलिंगांचे भक्तिभावाने पूजन
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात माळकिनी येथील श्री शिवलिंग स्वामी मठात सव्वा लाख शिवलिंगांचे सामूहिक पूजन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या अभूतपूर्व धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
या पूजन सोहळ्यासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भगवान महादेवाची आराधना केली. सव्वा लाख शिवलिंगांची एकाच ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आल्याने हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला.
भाविकांनी मोठ्या थाटामाटात आणि श्रद्धेने एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवलिंगांचे पूजन करून एक आगळावेगळा धार्मिक विक्रम घडवून आणल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पूजा, मंत्रोच्चार आणि हर हर महादेवच्या जयघोषाने मठ परिसर दुमदुमून गेला होता.
या धार्मिक सोहळ्यामुळे माळकिन्ही परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मनोभावे दर्शन घेत भगवान शिवशंकराच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.



