Uncategorized

३० वर्षांपासून फरार आरोपीला उमरखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पहाटे घरात घुसून जबरी चोरी करणारा आरोपी अखेर जेरबंद; डी.बी. पथकाची उल्लेखनीय कामगिरी

उमरखेड, दि. ५ सप्टेंबर २०२६ :
जिल्ह्यातील पाहिजे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेला उमरखेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल ३० वर्षांपासून फरार असलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने जेरबंद करून न्यायालयासमोर हजर केले.

उमरखेड शहरात १० मे १९९५ रोजी पहाटे सुमारे ३.१५ वाजता फिर्यादी महेश शशिकांत डांगे यांच्या राहत्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून त्यांना व घरातील व्यक्तींना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे १ लाख ९४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्यातील आरोपी परेश रामा काळे, रा. कोळी, ता. हदगाव, जि. नांदेड हा गुन्हा केल्यापासून फरार होता. त्याच्याविरुद्ध न्यायालयाचा मे. कोर्टाचा स्टँडिंग वॉरंट प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

उमरखेड डी.बी. पथकाने आरोपीचा गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला. आरोपी उमरखेड येथे आल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंत, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक गुरव कायदेपाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड तसेच ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाने केली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजय पतंग, पोलीस हवालदार प्रसन्नजित भवरे, पोलीस हवालदार अतुल तागडे, पोलीस शिपाई दिगांबर गिते, पोलीस शिपाई संभाशील टेंबरे, पोलीस शिपाई विष्णू राठोड, पोलीस शिपाई निवृत्ती महाळणर तसेच चालक पोलीस शिपाई आकाश पवार यांनी सहभाग घेतला.

तब्बल तीन दशकांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात आल्याने उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button