Uncategorized

हिवरा संगम ते पुसद कावड यात्रा उत्साहात तांडव बॉईज युवा मंडळाचा सलग तिसऱ्या वर्षी उपक्रम; ३५ किलोमीटर पायी प्रवास


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे :
महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे पैनगंगा, शिप आणि पूस या तीन नद्यांचा संगम आहे. या पवित्र संगमस्थळावरून तांडव बॉईज युवा मंडळाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी पुसद येथील महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढण्यात आली.
श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन सोमवारी युवा मंडळातील विद्यार्थ्यांनी हिवरा संगम-धनोडा परिसरातून पवित्र जल कावडीत घेऊन पुसदकडे पायी प्रस्थान केले. सुमारे ३५ किलोमीटरचा पायी प्रवास करत भक्तिमय वातावरणात कावड पुसद येथील महादेव मंदिरात अर्पण करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कावड यात्रेत युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वाटेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सलग तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे युवा पिढीमध्ये धार्मिक व सामाजिक एकतेची भावना वाढीस लागल्याचे दिसून आले.
कावड यात्रेमुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तांडव बॉईज युवा मंडळाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button