शहर

हिमायतनगर तालुका होऊन २७ वर्षे उलटली तरी हक्काचे बसस्थानक नाही! आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी गौमेपुरा भागात बस डेपो नसल्याने प्रवाशांचे हाल; श्री परमेश्वर मंदिर समितीचे मानले आभार


​ हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
​हिमायतनगर: सन १९९९ मध्ये हिमायतनगर तालुक्याची निर्मिती झाली. आज तालुका होऊन तब्बल २७ वर्षे उलटून गेली, तरीही या शहराला हक्काचे शासकीय बसस्थानक आणि एसटी डेपो मिळू शकलेला नाही. आजवर श्री परमेश्वर मंदिर संस्थानने दाखवलेल्या औदार्यामुळे मंदिर परिसरात बसगाड्या थांबवून प्रवाशांची तात्पुरती सोय केली जात आहे. या सहकार्याबद्दल मंदिर समितीचे सर्व तालुकावासीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार!
​परंतु, शहरात व गौमेपुरा परिसरात हक्काचे बसस्थानक नसल्यामुळे सरकारी बसगाड्यांची संख्या फार कमी आहे. यामुळे ‘काली-पिली’ (खाजगी वाहने) चालकांची मनमानी वाढली असून प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. हिमायतनगर येथे प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर, नामांकित धार्मिक शिक्षण संस्था दारुल उलूम मुहम्मदिया,व तसेच ससरकोण यांसारख्या भागांत रोज शेकडो मजूर, भाविक आणि प्रवासी बाहेरून येतात. पण सोयींअभावी सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
​या गंभीर समस्येची दखल घेत आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन हिमायतनगर येथे कायमस्वरूपी सुसज्ज बसस्थानक व डेपो त्वरित मंजूर करण्याची आग्रही मागणी केली.
​आमदारांनी वर्तमानपत्रातील वृत्तानुसार केलेल्या इतर प्रमुख मागण्या:
​हदगाव बसस्थानक: प्रवाशांच्या वाढत्या गर्दीसाठी हदगाव येथील बसस्थानकाचे नवीन बांधकाम व विस्तारीकरण करणे.
​तामसा बसस्थानक: वाढती प्रवासी संख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता तामसा येथे नवीन बसस्थानकासाठी निधी मंजूर करणे.
​परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांनी आमदारांच्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी विवेक देशमुख, आमदार बाबूराव कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button