शहर
नगरसेवक मो़ मुजतबा मतीन यांची तत्परता; वॉर्ड १४ मध्ये नवी मोटर बसवून पाण्याचा प्रश्न निकाली

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
शहरातील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये सय्यद अहमद यांच्या घरासमोरील मुख्य पाणीपुरवठा मोटर अचानक निकामी झाल्याने परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक मो़ मुजतबा मतीन यांनी तातडीने स्वखर्चाने किंवा प्रशासकीय निधीतून नवीन मोटर उपलब्ध करून दिली.
सदर मोटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाल्याने आता परिसरातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे. ऐन वेळी उद्भवलेल्या या संकटावर नगरसेवकांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे वॉर्डातील रहिवाशांनी त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.



