शहर

दारुल उलूम मोहम्मदियाचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी! नगराध्यक्ष शेख रफिक यांच्या धडाकेबाज पुढाकाराने हजारो विद्यार्थ्यांची तहान भागली!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): हिमायतनगर शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था दारुल उलूम मोहम्मदिया येथे दूरदूरवरून शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची आणि परिसरातील रहिवाशांची पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर कायमचा संपुष्टात आला आहे. बाहेरून आलेल्या या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, या उदात्त हेतूने लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक यांच्या कणखर नेतृत्वाखाली आणि प्रत्यक्ष उपस्थितीत विहिरीत पाणी सोडण्याचा कौतुकास्पद उपक्रम पार पडला.
​गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ही संवेदनशील बाब लक्षात येताच नगराध्यक्ष शेख रफिक यांनी तात्काळ प्रशासकीय सूत्रे हलवून विहिरीत पाणी सोडण्याची सोय केली. विहिरीत पाणी खळखळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले असून, या दूरदृष्टीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
​या प्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, अब्दुल अखिल, माजी जि. प. सदस्य समद खान, नगरसेवक विठ्ठल ठाकरे, नगरसेवक सरदार खान, नगरसेविका प्रतिनिधी अब्दुल कलीम, नगरसेविका प्रतिनिधी शेख इलियास, मर्कज जामा मशिदीचे सदर मुजीब खान व हनीफ सर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button