Uncategorized
घानमुख येथे विष प्राशन केल्याने व्यक्तीचा मृत्यू; पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील घानमुख येथे पूनम साहेबराव जाधव यांचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत रागाच्या भरात विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र, या घटनेबाबत महागाव पोलीस ठाण्यात वृत्त लिहिपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे समजते.



