Uncategorized

अंबोडा येथे ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा विहिरीत मृतदेह आढळला


महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मौजा अंबोडा येथे गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट २०२६) दुपारी एका शेतातील विहिरीत ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर प्रशांत राऊत यांच्या शेतातील (सर्वे क्रमांक ३५७) विहिरीत अंबोडा येथील नारायण माधव व्हगाडे (वय ७२) यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक कार्यवाही सुरू केली.
प्राथमिक माहितीनुसार, मृत नारायण व्हगाडे यांच्या नावावर अंबोडा येथे शेती नसून त्यांच्या मुलाच्या नावावर शेतजमीन असल्याचे सांगण्यात आले आहे.
मृतांच्या पश्चात पत्नी शांताबाई नारायण व्हगाडे, मुलगा दत्ता नारायण व्हगाडे, सून शालिनी अनिल व्हगाडे तसेच रेखा लक्ष्मण लांडगे, वर्षा विजय वानखेडे आणि ज्योती संदीप साबळे या तीन मुली असा परिवार आहे.
घटनेचा पुढील तपास महागाव पो. स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शना खाली जमादार जरांडे व बीट जमादार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button