Uncategorized

अमडापूर फाटा–आमडापूर मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा


महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील अमडापूर फाटा ते आमडापूर गावादरम्यानच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महागाव उपविभाग कार्यालयात निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व ॲड. युवराज पाटील देवसरकर यांनी केले. निवेदनात रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, काही नागरिकांनी उमरखेड–महागाव मतदारसंघातील आमदार किसन वानखडे यांच्याकडून दुर्गम भागातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अनेक गावांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित आमदारांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही.
निवेदनावर तातडीने कार्यवाही करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button