शहर

फेरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मोहम्मद मुजतबा मतीन यांचा धडाका; वॉर्ड क्र. १४ मध्ये मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती, नागरिकांना तात्पुरता दिलासा!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
वॉर्ड क्र. १४ मधील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण झाले होते. हीच गंभीर समस्या लक्षात घेऊन फेरोज खान यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली आणि युवा नगरसेवक मोहम्मद मुजतबा मतीन यांच्या विशेष पुढाकाराने या भागातील चिखल आणि खड्ड्यांचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले आहे. पावसाळ्यात नागरिकांची तातडीची अडचण दूर व्हावी, म्हणून हा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे.
​हा विकासाचा मार्ग थेट यांच्या घरासमोरून सुरू होऊन, भांडे बर्तनवाले फेरोज खान, शेख इलियास खुरेशी व कलीम भाई यांच्या घरासमोरून, तसेच बाबू भाई, शमशीर भाई आणि अहेमद भाई यांच्या घराच्या परिसरापर्यंत अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आला.
​चिखलातून तात्पुरता मार्ग निघाल्यामुळे आणि रस्त्याची अडचण दूर झाल्यामुळे या भागातील रहिवासी आणि यांच्यासह परिसरातील सर्वच नागरिकांनी एकत्र येत या तातडीच्या सुविधेबद्दल आणि कामाच्या तत्परतेबद्दल तीव्र समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button