Uncategorized

हिमायतनगर तालुक्यात पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक ‘व्यसनमुक्ती मोहीम’ ; सर्व ४७ गावे दारूमुक्त करण्याचा धडाकेबाज संकल्प!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): हिमायतनगर पोलीस ठाण्याचा पदभार २ जून रोजी स्वीकारल्यापासून पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी तालुक्यात सामाजिक परिवर्तनाची भव्य आणि ऐतिहासिक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील सर्व ४७ गावे पूर्णपणे दारूमुक्त आणि व्यसनमुक्त करण्याच्या खंबीर ध्येयाने ही ‘व्यसनमुक्ती मोहीम’ अत्यंत वेगाने व प्रभावीपणे राबवली जात आहे.
​या मोहिमेअंतर्गत नवाब खान पठाण, विजयकुमार अवुलवार, पोलीस प्रशासन, स्थानिक डॉक्टर आणि पोलीस पाटलांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत गावागावांत जाऊन दारूचे व्यसन समूळ नष्ट करण्यासाठी मोफत व्यसनमुक्ती औषधांचे वाटप केले जात आहे.
​विशेष म्हणजे, आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर जवळगाव येथे आयोजित बालदिंडी सोहळ्यात मुलांच्या भक्तिमय वातावरणासोबतच या व्यसनमुक्ती मोहिमेचा अत्यंत प्रभावी संदेश थेट ग्रामस्थांच्या घराघरांपर्यंत पोहोचवण्यात आला.
​पोलीस प्रशासन आणि डॉक्टरांच्या या अभूतपूर्व व कौतुकास्पद संयुक्त उपक्रमामुळे दारूच्या विळख्यात सापडलेल्या ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना नवीन आशेचा किरण मिळाला आहे. या क्रांतिकारी कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे हिमायतनगर तालुक्यातून सर्वस्तरावरून जोरदार कौतुक व स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button