शहर

मागील ठाणेदारांच्या काळात सुरू असलेल्या क्लबवर अखेर धाड; नवीन ठाणेदारांची कारवाई, चालक घटनास्थळावरून फरार


महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगव्हाण शेतशिवारात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ५२ पत्त्यांच्या अवैध जुगार अड्ड्यावर अखेर नवीन पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली धाड टाकून कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अड्डा चालवणारा मुख्य चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
याच कारवाईदरम्यान खडका फाटा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ जवळील हॉटेल शिवतेज येथे घरगुती वापरासाठी असलेले एचपी कंपनीचे गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वापरून काळाबाजार केल्याप्रकरणी हॉटेल चालकाविरुद्धही आवश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
महागाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी धाड टाकत ही कारवाई केली. जुगार अड्डा अनेक दिवसांपासून सुरू असल्याची परिसरात चर्चा होती. अखेर नवीन ठाणेदारांनी धडक कारवाई करून अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संवेद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button