Uncategorized

वडद शिवारात ३५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; महागाव पोलिसांकडून तपास सुरू


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वडद शेतशिवारात एका ३५ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाची ओळख भारत लहु वाघमारे (वय ३५, रा. कोपरा, ता. उमरखेड) अशी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह झाडावरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button