नगरपंचायत चा अनागोंदी कारभार व पाणीटंचाईच्या विरोधात आजाद समाज पार्टीचे शुक्रवारी जलसमाधी आंदोलन,

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उद्भवलेल्या पाणीटंचाईस जबाबदार असणाऱ्या नगरपंचायत अभियंता व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून जलशुद्धीकरण केंद्र सुरू करा याविषयी वारंवार मागणी करूनही नगरपंचायत दखल घेत नसल्यामुळे शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी गांजेगाव नदीपात्रात आजाद समाज पक्षाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना देण्यात आला,
याबाबत सविस्तर वृत्त असे की नगरपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ढाणकी वासियांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा पावसाळ्यातही सहन करावा लागत आहेत, ढाणकी ते गांजेगाव नदीद्वारे ढाणकी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त अवस्थेत आहे, नगरपंचायत स्थित जलशुद्धीकरण केंद्र ही बंद अवस्थेत आहे या सर्व बाबींना नगरपंचायतचा अनागोंदी कारभार जबाबदार असून याविषयी वारंवार निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने आझाद समाज पक्षाच्यावतीने दिनांक 4 जुलै शुक्रवारी गांजगाव येथील नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव, ढाणकी शहराध्यक्ष गोलू मुनेश्वर, तालुका महासचिव सचिन वाहुळे, एडवोकेट पंजाब नवसागरे, अरविंद धोंगडे, युवा शहराध्यक्ष समाधान नरवाडे, समाधान राऊत आबा गायकवाड यांनी दिला असून सद्य परिस्थितीत पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने आंदोलकाच्या जीवितवास बरे वाईट झाल्यास नगरपंचायत जबाबदारी व उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी यांनी जलसमाधी आंदोलनादरम्यान नदीपात्रात येऊन मध्यस्थी केल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे ही निवेदनात नमूद करण्यात आले



