हिमायतनगरमधील मुख्य रस्त्यावरील नाल्याच्या कामात गुत्तेदाराचा नंगानाच; शेख मसूद शेवालकर यांच्या घरासमोर आणि रहीम कॉलनी मशिदीकडे जाणारा महामार्ग १० ते १२ दिवसांपासून रोखला, बड्या नेत्याच्या आशीर्वादाने चक्क ५ एमएमचे लोखंड वापरून चालवलाय बोगस कारभार!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): शहरात सध्या गुत्तेदाराची प्रचंड मनमानी सुरू असून, अत्यंत ‘सोयीनुसार’ आणि ‘छोड-पकड’ पद्धतीने कामे केली जात आहेत. एखादा बडा राजकीय नेता किंवा वजनदार पदाधिकारी असेल, तर तिथे कामे तात्काळ पूर्ण केली जातात. मात्र, सर्वसामान्यांच्या भागात कामे रखडवली जात आहेत. या पक्षपाती कारभाराचे जिवंत उदाहरण म्हणजे शेख मसूद शेवालकर यांच्या घरासमोर आणि रहीम कॉलनी मशिदीकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावरील नालीचे काम गेल्या १० ते १२ दिवसांपासून अर्धवट टाकून रस्ता पूर्णपणे जाम करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग (National Highway) आणि नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
हा मुख्य रस्ता महामार्गांतर्गत येत असल्याने हे काम थेट राष्ट्रीय महामार्ग विभाग (National Highway Department) आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या जिम्मेदारीत येते. मात्र, महामार्गावरील हे अत्यंत महत्त्वाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असताना आणि अवघ्या आठ दिवसांत जागच्या जागी कोसळत असतानाही, संबंधित विभागाचे अभियंते आणि अधिकारी याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहेत.
गुत्तेदाराला नेमका कोणाचा वरदहस्त? जनतेत चर्चांना उधाण
या संपूर्ण मनमानी आणि निकृष्ट कारभारामागे मतदारसंघातील एका वजनदार आणि बड्या नेत्याचा थेट वरदहस्त व राजकीय सपोर्ट असल्याची जोरदार चर्चा सध्या हिमायतनगरच्या जनतेत रंगली आहे. नेत्याच्या या पाठींब्यामुळेच गुत्तेदार आणि अधिकारी कोणालाही न जुमानता जनतेच्या पैशांची उघड होळी करत आहेत.
५ एमएमचे लोखंड वापरून चालवलाय बोगस कारभार; ड्रीम लाईनचा पूल (ब्रिज) कोसळला!
या कामाचा दर्जा इतका निकृष्ट आणि बोगस आहे की, रस्त्यांवर ठिकठिकाणी आताच भगदाडे पडली आहेत. ड्रीम बारजवळील ड्रीम लाईन परिसरात तर नालीवरील संपूर्ण पूल (ब्रिज) खाली कोसळला असून, तिथून आता केवळ एक मोटरसायकल जाण्यापुरतीच जागा訊 शिल्लक उरली आहे.
नियमानुसार या बांधकामात १० ते १२ एमएमचे लोखंड वापरणे बंधनकारक असताना, गुत्तेदार मात्र केवळ ५ एमएमचे अत्यंत बारीक लोखंड (गज) वापरून काम उरकून घेत आहे आणि या भागातील हजारो नागरिकांच्या जिवाशी थेट खेळत आहे. ५ एमएमचे लोखंड वापरून हजारो लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या गुत्तेदाराची आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या महामार्ग विभाग व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता हिमायतनगरच्या जनतेतून कडक शब्दांत केली जात आहे.



