माननीय तहसीलदार साहेबांचा साधेपणातून प्रशासनाचा आदर्श

सहसंपादक शेख मुजाहिद :
ाल माननीय तहसीलदार साहेबांनी कामानिमित्त तरोडा येथे भेट देऊन जनगणनेच्या SIR कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मतदान नोंदणीच्या कामात कार्यरत असलेल्या बी.एल.ओ. कैलास वान्नरे यांच्यासोबत कोणताही औपचारिकपणा न ठेवता त्यांच्याच बरोबरीने जमिनीवर बसून त्यांनी सुरू असलेल्या कामाची सविस्तर माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या. त्याचबरोबर ज्या वडार समाजाच्या घरामध्ये बसलेले होते त्यांच्याच घरी
माननीय तहसीलदार साहेबांनी त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधला. याच घरात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बसून त्यांनी चहाचा स्वीकार केला. त्यांच्या या साधेपणामुळे आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे उपस्थित नागरिक व अधिकारी प्रभावित झाले.
माननीय तहसीलदार साहेबांनी संपूर्ण दौऱ्यात कोणताही दिखाऊपणा न ठेवता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या या लोकाभिमुख, संवेदनशील व साध्या कार्यपद्धतीतून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होईल.



