Uncategorized

मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी हिमायतनगरमध्ये विशेष मोहीम; उपविभागीय अधिकारी (एसडीएम) व तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे मार्गदर्शन


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकशाही बळकट करण्यासाठी हिमायतनगर शहरात ‘मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ प्रशासनाच्या वतीने अत्यंत गांभीर्याने राबवला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी (एसडीएम) साहेब आणि तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलमधील मतदान केंद्राला (बूथ) प्रत्यक्ष भेट देऊन कामाची सविस्तर पाहणी केली.
​यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्यांनी दोन अत्यंत महत्वपूर्ण मुद्द्यांवर विशेष भर दिला. प्रथम, मतदार याद्यांचे पूर्ण शुद्धीकरण करताना त्यांनी स्पष्ट केले की, “एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये आणि यादीत कोणतीही दुबार किंवा बोगस नावे राहू नयेत, यासाठी हे विशेष शुद्धीकरण अभियान अत्यंत गरजेचे आहे.” द्वितीय, १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नवमतदाराने आपले नाव नोंदवावे, तसेच कुटुंबातील महिलांची नावे अचूकपणे नोंदवून घेऊन लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन केले.
​या महत्त्वपूर्ण प्रसंगी हिमायतनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शेख रफिक भाई, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार आणि माजी नगराध्यक्ष अखिल मसुद खान मन्नान भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय व राजकीय स्तरावरून नगरसेवक विठ्ठल ठाकरे, फेरोज खान, गजानन चायल, संजय माने, मंडळाधिकारी बी. एम. चव्हाण यांच्यासह हिमायतनगरचे शिक्षक (मास्तर), स्थानिक पत्रकार बंधू, शहरातील इतर नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button