Uncategorized

संतांच्या शुभहस्ते महागाव बसस्थानक परिसरात वृक्षारोपण


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
श्री संत सद्‍धर्म शिरोमणी गुरुवर्य सद्गुरु व्यंकट स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते महागाव बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डेपो व्यवस्थापक बंडू पारवेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संतांच्या पवित्र हस्ते झालेल्या या वृक्षारोपणामुळे परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सध्या महागाव येथील नवीन बसस्थानकाचे बांधकाम सुरू असून, भविष्यात या वृक्षाची सावली प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button