हिमायत नगर: नगराध्यक्ष शेख रफिक ‘ॲक्शन मोड’वर; वार्ड क्र. ८ चा पाणीप्रश्न सुटला! नगरसेवक जिशान मिर्झा यांचा पाठपुरावा यशस्वी; नगरपंचायतीच्या निधीतून बोरवेलचे काम पूर्ण

हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख खयुम):
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भीषण पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी नगराध्यक्ष शेख रफिक सध्या पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक ८ मध्ये विकासकामांचा धडाका सुरू असून, नगरसेवक जिशान मिर्झा यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळत विशेष निधी मंजूर करून आणला आहे.
रात्री उशिरापर्यंत कामाची पाहणी:
नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याची झळ सोसावी लागू नये, यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून बोरवेलचे काम रात्री उशिरापर्यंत उभे राहून पूर्ण करून घेतले. यामुळे परिसरातील महिलांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. यावेळी अब्दुल सलाम कुरेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देणाऱ्या या नेतृत्वाचे हिमायत नगरमध्ये कौतुक होत आहे.



