शहर

महागाव पोलिसांची २० मिनिटांत धडक कारवाई; जबरी चोरी प्रकरणातील ५ आरोपी जेरबंद महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


महागाव, दि. १८ जून : महागाव शहरात जबरी चोरी करून एका व्यक्तीकडून रोख रक्कम हिसकावून नेणाऱ्या पाच आरोपींना महागाव पोलिसांनी अवघ्या २० मिनिटांत अटक करून गुन्ह्याचा छडा लावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी सुशांत रामकृपाल तिवारी (वय ६०) हे महागाव येथे आले असता जुन्या बसस्थानकाजवळ काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण करून खिशातील ४०० रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस मोटारसायकलवर बसवून तहसील कार्यालयामागील परिसरात नेले व पुन्हा मारहाण करून त्यांच्या खिशातील २३,६०० रुपये हिसकावून घेतले. एकूण २४ हजार रुपयांची रक्कम लुटून आरोपी पसार झाले.
याप्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डिगंबर विलास नरवाडे (२७), बुधभूषण महेंद्र बनवाडे (२२), बुधभूषण रमेश कांबळे (२६), अभिजित अविनाश पद्मवार (१६) व विराज विनोद भंगे (२७) या आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील २0 हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड श्री. हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे, पोउनि. किशोर मुरकुटे व त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button