शहर

विधानपरिषद निवडणूक : मतदानाच्या काही तास आधी हिमायतनगरमध्ये ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा हायव्होल्टेज ड्रामा


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी, शेख खय्यूम):

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या (दि. १८) मतदान होत असून, तत्पूर्वी हिमायतनगरसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. गुप्त मतदानात ‘क्रॉस व्होटिंग’ होऊन दगाफटका होऊ नये, म्हणून प्रमुख पक्षांनी आपल्या नगरसेवकांना थेट गोवा आणि बंगळुरूला सहलीवर धाडल्याने स्थानिक पातळीवर प्रचंड खळबळ उडाली आहे.
​खासदार अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, आष्टीकरांचे तगडे आव्हान
​या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर महाविकास आघाडीने शिवसेना (UBT) चे कृष्णा पाटील आष्टीकर यांना रिंगणात उतरवून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच वंचितचे प्रशांत इंगोले यांच्यामुळे लढत त्रिकोणी झाली असून, घोडेबाजार रोखण्यासाठी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.
​माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या बालेकिल्ल्यात नगरसेवक ‘नॉट रीचेबल’ ची चर्चा सुरू होती पण या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि हाय कमांडच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठीच सर्व नगरसेवक बाहेर गेले असून, १८ तारखेच्या मतदानासाठी पक्षाच्या आदेशानुसार ते पूर्णपणे एकनिष्ठ असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button