शहर

राहूर येथे प्रचंड प्रमाणात डायरिया साथ रोगाची लागण!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
ग्रामपंचायतच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा विहिरीवरून गावातील नागरिकांना पाणीपुरवठा होत गावालगत असलेल्या ह्या विहिरीमध्ये गटाराचे तुंबलेले दूषित पाणी विहिरीत गेल्यामुळे पाणी पिल्याने गावकऱ्यांना डायरिया झाल्याची चर्चा जिल्हाभरात पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ झाली.
महागाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या राहूर या गावात 30 सप्टेंबर रोजी डायरियाची लागण झाल्याचे उघड होताच आरोग्य यंत्रणा तातडीने दाखल झाली. जिल्हा परिषद शाळेमध्ये डायरियाची लागण झालेल्या पंधरा रुग्णांना तातडीने गावात प्रथमोपचार करण्यात आला. महागाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिनिष धुळेधुळे यांनी कर्तव्यामध्ये दक्षता दाखवत तातडीने फुलसांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमुला लागण झालेल्या राहुर गावात उपचारासाठी पाचरण केले. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असलेली विहीर नाल्याच्या खोलगट भागामध्ये असल्यामुळे संपूर्ण गावातील गटाराचे सांडपाणी या विहिरीमध्ये पाझरते, त्यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले. सततच्या अतिवृष्टीमुळे या विहिरीमध्ये घाण पाणी जास्त प्रमाणात आले. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे.
(बॉक्स)
केमिकल द्रवणामध्ये पिकविलेल्या केळीने डायरिया झाल्याची चर्चा;
सोमवारी 30 सप्टेंबर रोजी राहुर या गावी डायरियाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने ग्रामस्थ कमालीचे घाबरले. त्या मुळे सरपंच शिवाजी गोपनवाड यांनी यंत्रणेला सूचना कळविले. या ठिकाणचे 70 टक्के नागरिक या विहिरीवर पाणी पितात, परंतु गावातील 30 टक्के नागरिक आरोचे फिल्टर झालेले पाणी पीत असतात. तरीही अनेकांना डायरीयाची लागण झाली. गावामध्ये दुर्गा उत्सवा निमित्ताने अनेक महिलांना उपवास असल्याने केळी वाटप करण्यात आल्या. केमिकल युक्त मिश्रणामध्ये जलद गतीने प्रक्रिया करून पिकवलेली केळी खाण्यात आल्याने अनेकांना ही लागण झाल्याचे समजते. या साठी अन्न औषधी विभागाने तातडीने दखल घेत अशा केळी विक्रेत्यावर धाडी टाकून जनतेच्या आरोग्यासी खेळणाऱ्या विक्रीवर निर्बंध लादावे, जेणेकरून जनतेचे आरोग्य अबाधित राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button