शहर

, महागाव तालुक्यात प्रशासन अधिकारी न्यायालयीन वरिष्ठांचे आदेश ची पायमल्ली करतात(गटविकास अधिकारी यांचे कंटेम्पऑफ कोर्ट प्रकरण दाखल होणार)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात राहुल येथील सरपंच राजनंदनी शिवाजी कांचेवाड यांना ४ -८ -2025 रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी सरपंच पदावर अपात्र केलं होते गटविकास अधिकारी यांनी त्यावेळेस राहुल येथील सरपंचाचा पदभार उपसरपंच यांच्याकडे देण्यात आला होता .परंतु अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला 13- 8 -2025 रोजी अप्पर उप आयुक्त अमरावती सुरेश वाघमारे साहेब यांच्याकडे अपील केले व त्यावेळेस त्यांनी न्यायालयात आव्हान दिलेल्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला व त्यावर युक्तिवाद ऐकून घेण्यात आला दोन्ही वकिलाचा युक्तिवाद ऐकून कागदपत्रे विचारात घेता सुनावणीची पुढील तारखेपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्यात यावी असा आदेश पारित केला .दिनांक 13- 8 -2025 रोजी करण्यात आला तरी देखील गटविकास अधिकारी यांनी सरपंचाचा पदभार न्याय पिढीत महीला सरपंचाला न दिल्यामुळे अखेर पंचायत समिती कार्यालय महागाव येथे महीला सरपंच यांना उपोषण करावे लागले व उपोषण दरम्यान ६-१०-२०२५ रोजी तब्येत बिघडल्यामुळे दवाखान्यात भरती करण्यात आले परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे .गट विकास अधिकारी श्री कदम साहेब बघ्याची भूमिका घेत असून वरिष्ठांचे आदेशाचे पालन न केल्यास अधिकाऱ्याच्या विरोधात कंटेम्प ऑफ कोर्ट दाखल करत असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button