शहर

काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर पोलीस ठाण्यात भव्य सत्कार! नगराध्यक्ष शेख रफिक अन् पोलीस प्रशासनाची प्रमुख उपस्थिती


​हिमायतनगर तालुका ( प्रतिनिधी शेख खय्यूम):
येथील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आघाडीचे नेतृत्व, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिमायतनगर पोलीस ठाण्यात एका विशेष आणि शानदार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हिमायतनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या हस्ते फेरोज खान यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अत्यंत यथोचित व भव्य गौरव करण्यात आला.
​या दिमाखदार सोहळ्याला हिमायतनगर नगरपंचायतीचे लोकप्रिय नगराध्यक्ष शेख रफिक, पी. आय. लक्ष्मण केंद्रीय यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पांडुरंग वाठोरे आणि पोलीस उपनिरीक्षक अजमोदीन पाशामियाँ शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.
​यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेरोज खान यांच्या जनसेवेचा गौरव करत त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस आणि वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पोलीस ठाण्यात झालेल्या या आगळ्यावेगळ्या आणि सन्मानजनक सत्काराबद्दल फेरोज खान यांनी पोलीस प्रशासन आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नेत्यांचे व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button