Uncategorized

नागपूर विभाग मराठा महासंघाच्या वतीने स्व. शरदराव भोसले व स्व. सतीशजी गिरमकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृह, सक्करदरा चैक, नागपूर येथे निःशुल्क उपवर वधू – वर परिचय मेळावा व कमी शुल्कातील माहिती पुस्तिकेचे विमोचन संपन्न.


प्रतीनिधि नागपूर
शिक्षण, प्रशिक्षण, व्यवसाय व नोकरी इत्यादीमुळे सर्वच समाजातील मुला मुलींचे विवाह योग्य वयात होत नसल्याने सध्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. योग्य वयात विवाह न जूळने, विवाह जूळवून देण्यासाठी मध्यस्थां मार्फत काही ठिकाणी झालेली फसवणूक, निवड करतांना मुलामुलींमधली एक प्रकारची अस्वस्थता यामुळे अनेक कुटूंबात चिंतेचे वातारण आहे. म्हणूनच मराठा महांसघाच्या नागपूर विभागाने पुढाकार घेवून रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृह, सक्करदरा चौक, नागपूर येथे निःशुल्क उपवर वधू – वर परिचय मेळावा सम्पन्न झाला.
नागपूर विभाग मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री नरेन्द्र मोहिते मुख्य आयोजक असलेल्या या परिचय मेळाव्यात महाराजा ऑफ ट्रस्ट व नागपूर संस्थापक भोंसले राजघराण्याचे श्रीमंत मुधोजीराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेत, अ.भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेन्द्रजी कोंढरे यांच्या शुभ हस्ते व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. विनायकराव पवार, विराण डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर श्री दिलीपराव चव्हाण आणि नवनिर्वाचीत नगरसेवक मा. सचिनजी नाईक या मान्यवराच्या उपस्थितीत 340 विवाहयोग्य मुलामुलींची माहिती असलेली 250/- रु किंमतीची माझा जोडीदार या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
या कार्यक्रमात छत्तीसगढ व मध्यप्रदेश सोबतच महाराष्ट्राच्या विविध भागातून मुले मुली व पालक उपस्थित राहिले. यावेळी 102 उपवर मुलामुलींनी उपस्थितांसमोर स्वतःचा सविस्तर परिचय दिला. परिचय देण्यासाठी प्रत्यक्ष स्टेजवर आलेल्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संपूर्ण मराठा समाजाला एकत्रित करणाच्या या यशस्वी उपक्रमाबद्दल दूरदृष्टीने नियोजन करणारे मेळाव्याचे मुख्य आयोजक नरेन्द्र मोहिते यांच्या नेतृत्वात महासंघातील पदाधिकाऱ्यांच्या अचूक नियोजनामुळेच इतक्या उष्ण वातावरणात हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीतही हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.मेळाव्यात आलेल्या पालकांसाठी उत्कृष्ट आसनव्यवस्था, तत्पर नोंदणी कक्ष आणि चोख भोजन व्यवस्था राखण्यासाठी आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी आणि समाजबांधवांनी स्वयंस्फूर्त परिश्रम घेतले.
आयोजन समितीमध्ये नरेन्द्र मोहिते, विठ्ठलराव जावळकर, दिलीपराव सस्ते, अविनाश घोगले, संजयराव घारगे, देवेंद्रजी शिंदे, मोहनराव जाधव, दिपकराव बानगळे, सुशांत शिंदे, दिपकराव देशमुख, अमित सवडे, गुणवंत माने, महेश पवार, राजेंद्र चवळे, प्रविण माने दिलीप निघडे, प्रविण सोमोसे, राजेंद्र सावंत, सुनील चोपडे (चंद्रपूर), महेंद्र तुपकर (गोंदिया), संजय मोहिते (भंडारा), अरुण जगताप, उमाकांत डुकरे (वर्धा), राजेंद्र सावंत इत्यादी चा समावेश होता.माझा जोडीदार या पुस्तिकेसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या समाजातील दानशूर बंधू भगिनींचे व कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आयोजन समितीने आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन सौ ममता भोसले व नरेन्द्र मोहिते, प्रास्ताविक नरेन्द्र मोहिते आणि आभार प्रदर्शन मोहन जाधव यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button