Uncategorized

हिमायतनगर पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे संविधानाची चौकट आणि पोलीस नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)

: नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या मुख्य पदावर नूतन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
​पोलीस प्रशासनाचा संपूर्ण कारभार हा पूर्णपणे भारतीय संविधान, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Police Act) आणि अधिकृत पोलीस मॅन्युअलच्या अधीन राहूनच चालवला जाईल, अशी ग्वाही जनमानसातून दिली जात आहे. कोणत्याही दबावाशिवाय केवळ कायद्याचे राज्य (Rule of Law) आणि संविधानाची चौकट यानुसारच नागरिकांची सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था राखणे हे पोलीस यंत्रणेचे मुख्य कर्तव्य आहे.
​नूतन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे आपल्या शासकीय अधिकारांचा वापर करून, शासकीय नियमांच्या चौकटीत राहूनच हिमायतनगर तालुक्याचा कारभार अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button