उमरखेड–महागाव मतदारसंघात ‘दावत’ राजकारणाची चर्चा; विकासाऐवजी दिखाव्यावर टीका पळीभर रस्सा पाच वर्षे बोंबलत बसा

महागाव प्रतिनिधी :संजय नागरगोजे
दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उमरखेड–महागाव मतदारसंघात बिजोरा फाट्यावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य दावत कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आमदार Kisan Wankhede व Nitin Bhutada यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. व्यापारी, पत्रकार, पोलीस अधिकारी, आजी-माजी सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील सभापती-उपसभापती यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. माजी आमदारांचाही सहभाग होता.
मात्र, कोणताही विशेष प्रसंग, वाढदिवस किंवा ठोस कारण नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बकऱ्याची दावत देण्यात आल्याने मतदारसंघात चर्चा रंगली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशा दावत कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
दरम्यान, नुकतेच महागाव नगरपंचायतीत सत्तांतर झाले असून Ranjana Ade यांची नगराध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तसेच, सहकार क्षेत्रातही काही राजकीय घडामोडी घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर या दावत कार्यक्रमाचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत.
परंतु, या सर्व घडामोडींमध्ये मतदारसंघातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “विकासकामे प्राधान्याने व्हावीत, दावत नव्हे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, उमरखेड नगरपंचायत व महागाव नगरपंचायत हद्दीत अपेक्षित विकास दिसून न आल्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी तात्पुरती स्वच्छता मोहीम राबवून नंतर दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.
एकूणच, दावत कार्यक्रमामुळे राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात परिवर्तनाची चर्चा रंगू लागली आहे. “जनतेला विकास हवा, दिखाऊ कार्यक्रम नव्हे,” पळीभर रस्सा पाच वर्षे बोंबलत बसा असा स्पष्ट संदेश नागरिकांकडून दिला जात आहे.



