शिक्षक दिनानिमित्त किरण नॅचरल ऑईल मिलचा स्तुत्य उपक्रम शिक्षकांचा हृदयस्पर्शी सन्मान; सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
श्रीरामपूर, दि. ५ सप्टेंबर २०२६ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून किरण नॅचरल ऑईल मिलच्या वतीने शिक्षकांचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. शिक्षक व विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तसेच शेतकरी नेते मनीष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी किरण नॅचरल ऑईल मिलच्या विविध उत्पादनांची माहिती घेत संस्थेच्या सामाजिक बांधिलकीतून सुरू असलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करून त्यांना योग्य मोबदला देणे तसेच ‘शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी एक पाऊल’ हा उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
किरण नॅचरल ऑईल मिलच्या वतीने श्रीराम वानखेडे सर यांनी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व मनीष जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. नयनश्री वानखेडे यांच्या हस्ते मनीषभाऊ जाधव यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
मान्यवरांनी मिलमध्ये शुद्ध व नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येणारे करडई तेल, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल तसेच दुभत्या जनावरांसाठी उत्कृष्ट ढेप आदी उत्पादनांची माहिती घेतली.
शिक्षक दिनानिमित्त उपस्थित शिक्षकांचा किरण नॅचरल ऑईल मिलच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या समाजातील योगदानाचा गौरव करत त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गौतम रणवीर, विकास राठोड, सरागे सर व योगशिक्षक झरकर सर यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला ढेकणे साहेब, आगाशे दादा, सांडवकर सर, प्रा. उल्हास चव्हाण, नगरसेवक अक्षय महाकाळ यांच्यासह निंबी येथील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कवाने, ग्राम महसूल अधिकारी यांनी केले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732



