Uncategorized
उमरखेड–महागाव मतदारसंघात पाण्याचा तीव्र प्रश्न; पैनगंगा नदी कोरडी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघातील उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी सध्या पूर्णपणे कोरडी पडली असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रात पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांसह पशुधनालाही पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत चालली असून जनावरांसाठीही पाणी उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ईसापूर धरण प्रकल्पातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.



