शहर

परिविक्षाधीन तहसीलदार रोहित शिंदे त्यांची पुन्हा रेती माफिया वर कारवाई

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून रोहित शिंदे नुकतेच रुजू झाले यांनी या अगोदर अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडून कारवाई केली होती . परिसरामध्ये त्यांची चांगली दहशत निर्माण झाल्याने त्यांना शासकीय गाडी तहसीलदार अभय मस्के यांनी देणे टाळले तरी देखील दि.९-१०-२५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास एम एच 34 एम 6003 अवैध रेती टिप्पर रेती वाहतूक करताना पकडण्यात आले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांच्या मार्गदर्शनात रोहित शिंदे परीविक्षाधीन तहसीलदार महागाव व व्ही व्ही पवार नायब तहसीलदार महागाव, एस एस फटाले मंडल अधिकारी मोरथ, ग्राम महसूल अधिकारी सुनील बोईनवाड, अंकुश उईके ग्राम महसूल अधिकारी सवना, महसूल सेवक सदानंद जराड, देवानंद खूपसे या सर्वांच्या सहकार्याने मोजा सोनार रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर ताब्यात घेऊन तहसील कार्यालय येथे लावण्यात आले दंड करून पुढील कारवाई करण्याकरता उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांच्याकडे प्रकरण दाखल केले. त्यामुळे परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे .शासनाची गाडी त्यांच्या ताब्यात दिल्यास लाखो रुपयांचा महसूल शासन जमा होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button