Uncategorized

बोरगडी तांड्यावर दु:खाचा डोंगर: रागाच्या भरात सुखी संसार उद्ध्वस्त, तीन निष्पाप मुले झाली पोरकी


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील बोरगडी तांडा येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाले असून, पती उत्तम विनायक राठोड (वय 40 वर्षे) याने आपली पत्नी पायल उत्तम राठोड (वय 35 वर्षे) हिची हत्या करून स्वतः देखील गळफास लावून आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, आई-वडील गमावलेली तीन निष्पाप चिमुकली आता पूर्णपणे अनाथ झाली आहेत.
​घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा सूक्ष्म पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस प्रशासन अत्यंत तत्परतेने या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. या कठीण प्रसंगात पोलिसांनी दाखवलेल्या मुस्तैदीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
​तपासी अधिकारी व कर्मचारी:
अमोल भगत (पोलीस निरीक्षक)
व सहकारी पोलीस कर्मचारी, पोलीस स्टेशन हिमायतनगर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button