शहर

चिमुकल्या ज़ोहन सैय्यदचा कमाल! वयाच्या ७व्या वर्षी सलग ३० रोजे पूर्ण

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना आता अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, शहरातील एका चिमुकल्याने आपल्या जिद्दीने आणि श्रद्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उमरखेड येथील ज़ोहन सैय्यद काशिफ (वय ७ वर्षे) या बालकाने यंदाच्या रमजानमध्ये तब्बल ३० रोजे (उपवास) पूर्ण करत एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. एवढ्या लहान वयात, कडक उन्हाचा सामना करत त्याने दाखवलेली चिकाटी आणि श्रद्धा खरोखरच प्रेरणादायी आहे.
ज़ोहन हा सुनरेज़ शाळा, उमरखेड येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असून, लहानपणापासूनच धार्मिक संस्कार आणि इबादतीची ओढ त्याच्यात दिसून येते. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे ठेवणे हे मोठ्यांसाठीही आव्हानात्मक असते, मात्र या चिमुकल्याने ते यशस्वीरित्या पूर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जिथे सर्वत्र इबादतीचा आणि आनंदाचा माहोल आहे, तिथे ज़ोहनच्या या कामगिरीमुळे उमरखेड परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून “शाब्बास ज़ोहन!” अशा शब्दांत त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या या यशामुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळत असून, श्रद्धा आणि संयम याचे उत्तम उदाहरण त्याने घालून दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button