पुसद सार्वजनिक बांधकाम विभागात १५ कोटींचा ‘देयक घोटाळा’

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद सार्वजनिक बांधकाम विभागात सुमारे १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात संबंधित अभियंत्याला निलंबित करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या घोटाळ्यामुळे कार्यकारी अभियंता महेश मापुरकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोपानुसार, काही कंत्राटदारांना नियमबाह्य पद्धतीने सुमारे १५ कोटींची देयके अदा करण्यात आली.
काही कामे पूर्ण झालेली नसतानाही देयके काढण्यात आल्याचा आरोप पत्रात नमूद आहे.
विभागीय नियम व आर्थिक शिस्त मोडून शासन निधीचा अपव्यय झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना तात्काळ निलंबित करावे, तसेच शासनाच्या तिजोरीचे झालेले नुकसान त्यांच्याकडून वसूल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.



